IPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते उघडले

यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमनेसामने आले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 206 धावा करत बंगळुरूसमोर 207 धावांचे आव्हान ठेवले. मात्र डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ 109 धावांवर बाद झाला आणि पंजाबने 97 धावांनी विजय मिळवला.

बंगळुरू कडून वाशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 30 तर डिव्हीलिअर्सने 28 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिश्नोई आणि एम. अश्विन याने प्रत्येकी 3 बळी घेतले. कॉटरेलने 2, मोहम्मद शमीने आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी एक बळी घेतला.

IPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं

तत्पूर्वी पंजाबकडून कर्णधार के.एल. राहुल याने तुफानी खेळी करत शतक झळकावले. अखेरपर्यंत नाबाद राहत राहुलने 69 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 132 धावांची खेळी केली. के.एल. राहुल आणि मयांक अग्रवाल यांनाही पंजाबला 50 धावांची सलामी दिली. मयांक 26 धावांवर बाद झाला. यानंतर आलेला निकोलस पुरन 17 आणि मॅक्सवेलही 3 धावा काढून झटपट बाद झाले.

IPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल

समोरून खेळाडू बाद होत असताना राहुलने एक बाजू लावून धरत अखेरपर्यंत किल्ला लढवला. अखेरच्या काही षटकात राहुलने भात्यातील एकएक अस्र काढत स्टेनचीही धुलाई केली. यादरम्यान त्याला विराट कोहलीने दोन जीवदान दिले. याचा फायदा उठवत राहुलने चौकार ठोकत शतकाला गवसणी घातली.

आपली प्रतिक्रिया द्या