IPL 2020 – कल भी, आज भी..! पहिल्या सिझनपासून खेळताहेत ‘हे’ 13 खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळणे प्रत्येक हिंदुस्थानी खेळाडूचे स्वप्न असते. येथे मिळणारा बक्कळ पैसा, प्रसिद्धी, हिंदुस्थानी क्रीडा चाहत्यांचे प्रेम यामुळे विदेशी खेळाडूही या स्पर्धेत खेळण्याची संधी दवडू इच्छित नसतात. त्यामुळे दरवर्षी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक दिग्गज खेळाडू ही स्पर्धा खेळताना दिसतात. या स्पर्धेमुळे अनेक देशांच्या संघाला चांगले खेळाडू मिळाले आहेत.

2008 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा 13 वा हंगाम सध्या सुरू आहे. यंदा कोरोनामुळे ही स्पर्धा यूएईच्या धरतीवर होत आहे. आयपीएलसारख्या लीग पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज या देशातही सुरू करण्यात आल्या, मात्र त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अनेकांना ही संधी मिळते, तर काही वंचितही राहतात. मात्र काही खेळाडू असेही आहेत जे पहिल्या सिझनपासून खेळताना दिसत आहे.

जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू…
1. महेंद्रसिंह धोनी
2. रोहित शर्मा
3. दिनेश कार्तिक
4. विराट कोहली
5. रॉबिन उथप्पा
6. शिखर धवन
7. अमित मिश्रा
8. पीयूष चावला
9. मनीष पांडे
10. एबी डिव्हीलिअर्स
11. ऋद्धिमान सहा
12. पार्थिव पटेल
13. धवल कुलकर्णी

पहिल्या सिझनपासून खेळणाऱ्या खेळाडूत फक्त एबी डिव्हीलिअर्स हा एकमेव विदेशी खेळाडू आहे. तसेच यंदा मुंबईच्या संघात असणारा धवल कुलकर्णी आणि आरसीबीच्या संघात असणारा पार्थिव पटेल हे देखील पहिल्या सिझनपासून खेळत आहे. मात्र अजून त्यांना मैदानात उतरण्याची संधी मिळालेली नाही.

IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले

तसेच 2008 ते 2019 मध्ये खेळलेले सुरेश रैना, हरभजन सिंग, युसूफ पठाण यंदा खेळताना दिसणार नाहीत. सुरेश रैना आणि हरभजन यांनी स्वतःहून नाव मागे घेतले, तर युसूफ पठाणला यंदा कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या