IPL 2020मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज, अनकॅप खेळाडूंनी उमटवला ठसा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेची सांगता झाली असून मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुंबईने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा चषकावर नाव कोरले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा के.एल. राहुल याने केले. आपण सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 फलंदाजांबाबत जाणून घेऊया…

के.एल. राहुल (KXIP)

images-11

किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. मात्र सर्वाधिक धावा पंजाबचा कर्णधार के.एल. राहुलने केल्या. त्याने 154 लढतीत 670 धावा केल्या. यात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतक ठोकले.

शिखर धवन (DC)

images-12

दिल्ली कॅपिटल्स संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात शिखर धवन याचे मोठे योगदान राहिले. त्याने या स्पर्धेत
17 लढतीत 618 धावा केल्या. यादरम्यान 2 शतक आणि 4 अर्धशतक ठोकले.

डेव्हिड वॉर्नर (SRH)

david-warner

सनरायझर्स हैद्राबाद संघ स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिला. हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने 16 लढतीत 548 धावा केल्या. यात त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश असून सलग सहाव्या वर्षी 500 हून अधिक धावा ठोकण्याचा विक्रम त्याने केला.

Photo – ना गेल, ना विराट; ‘हा’ खेळाडू ठरला IPL 2020चा ‘सिक्सर किंग’

श्रेयस अय्यर (DC)

images-13

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यानेही यंदा आपल्या बॅटची जादू दाखवली. त्याने 17 लढतीत 3 अर्धशतकांच्या मदतीने 519 धावा केल्या.

ईशान किशन (MI)

images-14

मुंबई इंडियन्सचा डावखुरा फलंदाज ईशान किशन याने 14 लढतीत 516 धावा चोपल्या. यात त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे. स्पर्धेत सर्वाधिक 30 षटकार त्याने ठोकले.

क्विंटन डिकॉक (MI)

images-15

मुंबई इंडियन्सला पाचवे विजेतेपद पटकावून देण्यात क्विंटन डिकॉक याने मोलाचे योगदान दिले. त्याने प्रत्येक सामन्यात मुंबईला चांगली सलामी दिली. स्पर्धेत 16 लढतीत त्याने 503 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतक ठोकले.

सूर्यकुमार यादव (MI)

images-16

स्पर्धेत सर्वांची वाहवा मिळवलेल्या सूर्यकुमार यादव याने 16 लढतीत 480 धावा केल्या. यात त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे.सलग 3 सीझनमध्ये 400 हून अधिक धावा करणारा तो एकमेव अनकॅप खेळाडू आहे.

देवदत्त पडीकल (RCB)

images-17

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा डावखुरा खेळाडू देवदत्त पडीकल यानेही सर्वांचे लक्ष वेधले. त्याने यंदा 15 लढतीत 473 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 अर्धशतक ठोकले.

विराट कोहली (RCB)

images-18

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यंदा विशेष फॉर्मात वाटलं नाही. तरीही तो 400 धावा करण्यात यशस्वी झाला. त्याने 15 लढतीत 3 अर्धशतकांच्या मदतीने 466 धावा केल्या.

एबी डिव्हीलिअर्स (RCB)

images-19

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विस्फोटक खेळाडू एबी डिव्हीलिअर्स याने 15 लढतीत 454 धावा केल्या. यात त्याच्या 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या