IPL 2020 – पहिलीच मॅच अन डू प्लेसिसचा सुपर कॅच, तुम्ही पाहिलात का?

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सुरुवात झाली असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा रंगला. ही लढत चेन्नईने 5 विकेट्सने जिंकली आणि विजयाने सुरुवात केली. या लढतीत चेन्नईचा खेळाडू फाफ डू प्लेसिस याने जबरदस्त कॅच घेतला. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. वयाच्या 36 व्या वर्षीही त्याची चपळता पाहून प्रेक्षक अवाक झाले आहेत.

IPL 2020 – सर्वाधिक वेळा रनआउट झालेले टॉप 5 खेळाडू, ‘या’ चपळ खेळाडूचे वाचून व्हाल अवाक

चांगल्या सुरुवातीनंतरही चेन्नईच्या संघाने मुंबईला 162 धावात रोखले. याचे श्रेय गोलंदाजांसह क्षेत्ररक्षकांनाही जाते. मुंबईच्या डावात 15 व्या षटकात फाफ डु प्लेसिसने सीमारेषेवर अप्रतिम कॅच घेतला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर हार्डहिटर हार्दिक पंड्याने जोरदार शॉट मारला. चेंडू सीमारेषेपार जाईल असे वाटत असताना डु प्लेसिसने हवेत सूर मारत कॅच घेतला. मात्र यादरम्यान त्याचे संतुलन बिघडले.

IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार

डु प्लेसिस चेंडूसह सीमारेषा पार करणार असे वाटत असताना त्याने वेळीच चेंडू हवेत फेकला आणि सीमारेषा पार करून मैदानात येत पुन्हा झेलला. यामुळे पांड्या 10 चेंडूत 14 धावा काढून माघारी परतला. पांड्या आणखी काही षटक टिकला असता तर मुंबईला 190 चा आकडा पार करता आला असता.

https://twitter.com/ShrutiPoddar16/status/1307462344604172288?s=19

दरम्यान याच लढतीत फाफ डु प्लेसिस याने आणखी 2 कॅच घेत आपली छाप उमटवली. यानंतर धावांचा पाठलाग करताना रायडूसोबत 100 धावांची भागीदारी केली आणि अखेरपर्यंत 58 धावांवर नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.

Photo – IPL मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे टॉप 5 खेळाडू

आपली प्रतिक्रिया द्या