IPL 2020 – एकाच षटकात विराट-डिव्हीलिअर्सला बाद करत शमीची खास विक्रमाला गवसणी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत गुरुवारी अखेरच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने विजय मिळवला. पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. या लढतीत पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने एकाच षटकात बंगळुरूचे दोन विस्फोटक खेळाडू विराट कोहली आणि एबी. डिव्हीलिअर्सला बाद करत खास विक्रमला गवसणी घातली.

आयपीएल इतिहासात विराट आणि डिव्हीलिअर्सला एकाच षटकात बाद करणारा शमी आठवा गोलंदाज ठरला. डावाच्या 18 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर शमीने आधी डिव्हीलिअर्सचा बळी घेतला आणि पाचव्या चेंडूवर विराटला बाद केले. शमी आधी सात गोलंदाजांची दोघांना एकाच षटकात बाद करण्याचा कारणामा केला आहे.

या गोलंदाजांनी केली अशी कामगिरी
1. जॅक कॅलिस (आयपीएल 2012)
2. धवल कुलकर्णी (आयपीएल 2013)
3. आशिष नेहरा (आयपीएल 2015)
4. कृणाल पांड्या (आयपीएल 2016)
5. थिसारा परेरा (आयपीएल 2016)
6. नितीश राणा (आयपीएल 2018)
7. श्रेयस गोपाल (आयपीएल 2019)
8. मोहम्मद शमी (आयपीएल 2020)

पंजाबविरुद्ध मैदानात उतरताच विराटचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

दरम्यान, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाबकडून कर्णधार के.एल. राहुल आणि यंदाच्या लढतीत पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेल यांनी अर्धशतकीय खेळी केली. अखेरच्या षटकात अखेरच्या चेंडूवर निकोलस पूरन याने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या