IPL 2020 – दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज भिडणार, असा आहे मुंबई-चेन्नईचा ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड

आजपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची सुरुवात होणार असून पहिला सामना दोन कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता अबुधाबीच्या मैदानावर सामना सुरू होईल. आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा दोन्ही संघ शुभारंभाचा सामना खेळणार आहेत. याआधी दोन्ही झालेल्या तीन लढतीत मुंबईने 2 वेळा, तर चेन्नईने एकदा विजय मिळवला.

यूएईतील कामगिरी
यूएईमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी अगदीच खराब आहे. लोकसभा निवडणुकीमुळे 2014 ला आयपीएलच्या लीग मॅचेस यूएईला झाल्या होत्या. येथे मुंबईला 5 पैकी 5 मॅच गमवाव्या लागल्या होत्या. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी मुंबईच्या तुलनेत उजवी आहे. 6 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने येथे लढती खेळल्या होत्या. यात चेन्नईला 4 विजय मिळाले, तर 1 लढत गमवावी लागली. परंतु अबुधाबीला खेळलेल्या 2 पैकी 1 लढत चेन्नईने गमावली आहे.

हेड टू हेड
दोन्ही संघ आयपीएलमध्ये 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबईचे पारडे जड आहे. मुंबईने 18 वेळा चेन्नईला पराभवाचे पाणी पाजले आहे, तर 12 वेळा चेन्नई वरचढ ठरली आहे. गेल्या वर्षी अंतिम लढतीत मुंबईने चेन्नईला अवघ्या 1 धावेने पराभूत करत चौथ्यांदा विजेतेपद जिंकले होते. या लढतीचा वचपा काढण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरेल, तर मुंबई चेन्नईविरुद्धचा रेकॉर्ड आणखी मजबूत करण्यासाठी झुजताना दिसेल. मुंबईचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे, तर एम.एस. धोनीकडे चेन्नईची कमान आहे.

IPL 2020 – धोनीचे आयपीएलमधील अनोखे विक्रम, सातवा तर मोडणे अशक्य

प्रथम फलंदाजी करणाऱ्याला संधी
दरम्यान, या मैदानावर आतापर्यंत झालेल्या टी-20 लढतीत 44 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर 19 वेळा प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा एव्हरेज स्कोर 137 आहे, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचा एव्हरेज स्कोर 128 आहे.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

या खेळाडूंची उणीव भासणार
चेन्नईला आपला मजबूत फलंदाज सुरेश रैना आणि फिरकीपटू हरभजन सिंग याची उणीव भासणार आहे. रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या टॉप 5 फलंदाजात आहे, तर भज्जी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांना आहे. चेन्नईसह मुंबईच्या संघाला देखील लसीथ मलिंगाची उणीव भासेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे.

मुंबईचा संभाव्य 11 खेळाडूंचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

चेन्नईचा संभाव्य 11 खेळाडूंचा संघ
शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डुप्लेसिस, एम.एस. धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, पीयुष चावला, दीपक चहर आणि इमरान ताहिर.

Photo story – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

आपली प्रतिक्रिया द्या