IPL 2020 – मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, ‘ही’ आहे मुख्य अडचण

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | मुंबई

आयपीएलच्या 13व्या मोसमाला यूएईत 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या स्पर्धेचे सर्वाधिक चारवेळा अजिंक्यपद पटकावत वरचष्मा दाखवला आहे. मुंबईने ही स्पर्धा 2013, 2015, 2017 व 2019 या सालांमध्ये जिंकली आहे. त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत हा संघ गतविजेता म्हणून जेतेपद राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहे.

आयपीएलच्या 12 पैकी 4 मोसमात मुंबईने विजेतेपद पटकावत बाजी मारली आहे तर एकदा हा संघ रनरअप राहिला आहे. यासह 3 वेळा प्ले ऑफ मध्ये मुंबईचे आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईने स्पर्धेत आतापर्यंत 187 लढती खेळल्या असून सर्वाधिक 107 विजय मिळवले, तर 78 लढतीत पराभव स्वीकारला. तसेच 2 लढती बरोबरीत सुटल्या, मात्र यात मुंबईने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. मुंबईसाठी अडचणीची गोष्ट हीच आहे की आजपर्यंत त्यांनी नेहमीच विषम वर्षाला (2013, 2015, 2017 आणि 2019) विजय मिळवला आहे.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज

फलंदाजीची कमान
मुंबईच्या फलंदाजीचे ओझे अर्थात कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. रोहितने आयपीएलमध्ये 188 लढतीत 4,898 धावा चोपल्या आहेत. यासह 50 लढतीत 1,456 धावा काढणारा क्विंटन डिकॉक, 148 लढतीत 2,755 धावा करणारा किरोन पोलार्ड, 41 लढतीत 1,280 धावा करणारा क्रिस लिन, 66 लढतीत 1,068 धावा काढणारा हार्दिक पांड्या यांच्यावर असणार आहे. तसेच ईशान किशन, सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, कृणाल पांड्या अशी फौज मुंबईकडे आहे.

Photo story – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

गोलंदाजीत मलिंगाची उणीव भासणार
गेल्या वर्षी अंतिम लढतीत मुंबईला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणारा लसीथ मलिंगा यंदा स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. त्याची उणीव मुंबईला नक्की भासेल. मात्र मुंबईकडे नंबर वन गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 77 लढतीत 82 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 33 लढतीत 38 विकेट्स घेणारा ट्रेंट बोल्ट, 56 लढतीत 71 विकेट्स घेणारा मिचेल मॅकक्लिंघन, 26 लढतीत 36 बळी घेणारा नाथन कोल्टर नाईल असा ताफा आहे. यासोबत अनुभवी किरोन पोलार्ड, अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकीपटू कृणाल पांड्या आणि राहुल चहर अशी गोलंदाजांची फळी आहे.

IPL 2020 – सनरायझर्स हैद्राबादचा संघ मजबूत, पण ‘हे’ आहे मुख्य आव्हान

मुंबईचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डि कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नाथन कोल्टर-नाइल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिचेल मॅकक्लिंघन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल राय, इशान किशन.

IPL 2020 – राजस्थानचे ‘रॉयल’ दिवस पुन्हा येतील का? दिग्गज खेळाडूंच्या सहभागावर सवाल

आपली प्रतिक्रिया द्या