IPL 2020 – मुंबई भिडणार कोलकात्याला, रोहित अॅण्ड कंपनीला करायचेय कमबॅक

चारवेळा चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्सला या वर्षी आयपीएलच्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सकडून हार सहन करावी लागली. 2013 सालापासून त्यांना पहिल्या लढतीत विजय मिळवता आलेला नाही, पण आता हा पराभव मागे टाकून रोहित शर्माची सेना उद्या होणाऱया लढतीत झोकात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालीय. मुंबई इंडियन्ससमोर दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आव्हान आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्याच लढतीत विजय मिळवून आत्मविश्वास कमवण्यासाठी प्रयत्न करील यात शंका नाही.

आजची लढत – मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स, अबुधाबी  रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या