IPL 2020 – पहिल्या लढतीपूर्वी राजस्थान रॉयल्सला तगडा धक्का, 2 स्टार खेळाडू बाहेर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये उद्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना रंगणार आहे. चेन्नईने पहिल्या लढतीत गतविजेत्या संघाला पराभवाचे पाणी पाजल्याने राजस्थानवर मानसिक दबाव आहे. याच दरम्यान राजस्थानच्या संघाला आणखी 2 तगडे धक्के बसले असून इंग्लंडचा आक्रमक खेळाडू जोस बटलर (Jos Buttler) आणि बेन स्टोक्स (Ben stokes) पहिल्या लढतीला मुकणार आहे.

राजस्थानचा खेळाडू जोस बटलर यूएईमध्ये आपल्या कुटुंबासह आला असून त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मी पहिला सामना खेळू शकणार नाही, असेही त्याने सांगितले. तसेच संघाने यासाठी परवानगी दिल्याचे म्हणत त्याने अभारही मानले.

36 तासांचा क्वारंटाईन काळ
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील मालिका 16 सप्टेंबरला संपली आणि दोन्ही संघातील 21 खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी यूएईला रवाना झाले. हे खेळाडू बायो-बबल चार्टर्ड विमानाने यूएईला आले. त्यामुळे बीसीसीआयने त्यांचा क्वारंटाईन कालावधी फक्त 36 तासांचा ठेवला. मात्र बटलर आपल्या कुटुंबासह वेगळ्या विमानाने आल्याने त्याला 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

IPL 2020 – ‘हा’ एकमेव फास्ट बॉलर खेळलाय प्रत्येक आयपीएल, यंदा मुंबईकडून मैदान गाजवणार

स्टोक्सही मुकणार
दुसरीकडे आघाडीचा अष्टपैलू खेळाडू आणि राजस्थान रॉयल्स संघाचा कणा बेन स्टोक्स देखील अद्याप संघासोबत जोडला गेलेला नाही. स्टोक्सच्या वडिलांची तब्येत खराब असून त्यांच्या देखभालीसाठी तो न्यूझीलंडमध्ये आहे. तो यंदा आयपीएल खेळणार की नाही? कधीपर्यंत संघाशी जोडला जाणार? याबाबत काहीही सांगता येत नाही.

IPL 2020 – … तर सुपर ओव्हर झालीच नसती, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा पंजाबला फटका

आपली प्रतिक्रिया द्या