कोलकात्याचा संघ सातव्या क्रमांकावरून डायरेक्ट पोचला दुसऱ्या क्रमांकावर, राजस्थान रॉयल्सचा दारूण पराभव

बुधवारी आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुकाबला झाला. या सामन्यात कोलकात्याच्या संघाने राजस्थानच्या संघाला 37 धावांनी पराभूत केलं. या विजयामुळे गुणतालिकेत कोलकात्याचा संघ सातव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सने बुधवारचा सामना धरून एकूण तीन सामने खेळले आहेत. यातल्या दोन सामन्यांत त्यांना विजय मिळाला होता. विजयाची हॅटट्रीक करण्याची स्टीव्ह स्मिथच्या संघाला संधी होती, मात्र त्याने पहिले क्षेत्ररक्षणाचा फैसला करत स्वत:च गमावली असे क्रिकेटतज्ज्ञांचे मत आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघासमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले होते. पहिल्या दोन सामन्यात 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी हे आव्हान तुलनेने किरकोळ होते, मात्र ते पूर्ण करताना त्यांच्या संघाची दमछाक झाली आणि त्यांचा संघ 137 धावांत गारद झाला. या सामन्याच्या निकालामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाची संधी जास्त असते. आतापर्यंत झालेल्या 6 सामन्यांमध्ये पहिले फलंदाजी करणारा संघच जिंकला आहे. या आकड्यांकडे दुर्लक्ष करत स्टीव्ह स्मिथने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्या अंगाशी आला.

आपली प्रतिक्रिया द्या