IPL 2020 – रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा खेळाडू

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या लढतीत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 195 धावा उभारल्या. यात कर्णधार रोहित शर्मा याने 80 धावांचे योगदान दिले. त्याला सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल कोलकाताचा संघ 146 धावा करू शकला.

Photo story – आयपीएलमध्ये एकही चौकार न मारता अर्धशतक ठोकणारे 5 खेळाडू

प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डी कॉक झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत डाव पुढे नेला. रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार भागीदारी केली. सूर्यकुमार धावबाद झाल्यानंतर डावाची सूत्रे हाती घेत रोहितने तुफान फटकेबाजी केली. बाद होण्यापूर्वी त्याने 54 चेंडूत 3 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार ठोकत 80 धावा केल्या. यादरम्यान त्याने षटकारांचे अनोखे द्विशतक साजरे केले.

IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले

आयपीएलमध्ये काही मोजक्याच बोटावर मोजता येणाऱ्या खेळाडूंनी 200 किंवा त्याहून अधिक षटकार ठोकले आहेत. या यादीत आता रोहितचा समावेश झाला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधित षटकार अर्थात ख्रिस गेल (326) याने ठोकले आहेत. दुसऱ्या स्थानावर ‘360 खेळाडू’ एबी डिव्हीलिअर्स (214) असून तिसऱ्या स्थानावर हेलिकॉप्टर हीटर एम.एस. धोनी (212) आहे. आता 200 षटकारसह रोहित या पंक्तीत येऊन बसला आहे.

IPL 2020 – मैदानात येताना ‘ग्लुकोज’ चढवून या, दिग्गज खेळाडूने उडवली धोनीसेनेची खिल्ली

वॉर्नरचा विक्रम मोडला
दरम्यान, रोहितने 80 धावांच्या खेळीसह आणखी एका विक्रमला गवसणी घातली. आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झाला. त्याने सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या वॉर्नरचा केकेआरविरुध्दचा 829 धावांचा विक्रम मोडला. रोहितने केकेआरविरुद्ध 904 धावा चोपल्या आहेत.

शायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला लाजिरवाणा विक्रम

आपली प्रतिक्रिया द्या