IPL 2020 – ‘गब्बर’ची गर्जना, सलग दुसरे शतक झळकावत इतिहास रचला

दिल्ली कॅपिटल्सचा विस्फोटक सलामीवीर शिखर धवन याने मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध शतक झळकावले. धवनने 57 चेंडूत शतकाला गवसणी घातली. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकत धवनने इतिहास रचला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा धवन पहिला खेळाडू ठरला आहे.

पंजाबविरुद्ध वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या डावातील 19 वाट्या षटकात धवनने आपले शतक पूर्ण केले. चौथ्या चेंडूवर 2 धावा घेत 57 चेंडूत धवनने शतक ठोकले. धवनचे आयपीएल 2020 मधील हे सलग दुसरे शतक आहे. याआधी गेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शारजाहच्या मैदानावर धवनने नाबाद 101 धावांची खेळी केली होती. आजही तो 106 धावांवर नाबाद राहिला.

धवनने यादरम्यान आयपीएल मध्ये 5000 धावांचा टप्पा देखील ओलांडला. विराट कोहली, सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर यांच्यासह आता धवनचे नाव देखील या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहेत.

तसेच एकाच आयपीएलमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त शतक करणाऱ्या खेळाडूंच्या खास यादीत धवनचा समावेश झाला आहे. याआधी विराट कोहली याने आरसीबीकडून खेळताना 2014 ला 4 शतक, ख्रिस गेल याने 2011 ला आरसीबीकडून खेळताना 2 शतक, हाशिम आम्ला याने 2017 ला पंजाबकडून खेळताना 2 शतक आणि शेण वॉटसन याने 2018 ला चेन्नईकडून खेळताना 2 शतक ठोकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या