IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार

टीम इंडियाचा आणि आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. यात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. सोमवारी सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना रंगला. या लढतीत विराटच्या संघाने हैद्राबादचा 10 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. या विजयासह विराटने एम.एस. धोनी, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

सॅमसनची तुफानी खेळी, अशी कामगिरी करणारा RR चा पहिला खेळाडू; राहुलच्या विक्रमाचीही केली बरोबरी

सोमवारी बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 163 धावा केल्या. सलामीवीर देवदत्त पडीकल आणि एबी. डिव्हीलिअर्स यांनी अर्धशकत ठोकले. बांळुरूने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादचा संघ चहलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि 153 धावांवर बाद झाला. आरसीबीने 10 धावांनी विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा हा 50 वा विजय आहे.

IPL 2020 – सोशल मीडियावर उडतेय पांड्याची खिल्ली, ‘हे’ 10 खेळाडूही झालेत ‘हिटविकेट’

आयपीएलमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विजय मिळवणाऱ्या मोजक्या कर्णधारांच्या पंक्तीत विराट कोहली याला स्थान मिळाले आहे. विराटच्या आधी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस. धोनी (105 विजय), कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर (71 विजय) आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (60 विजय) यांच्या नावावर अशा कामगिरीची नोंद आहे.

IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले

दरम्यान, 2008 पासून आरसीबीकडून खेळणाऱ्या विराटच्या खांद्यावर 2011 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून त्याने 111 लढतीत संघाचे नेतृत्व करताना 50 विजय मिळवले असून 55 पराभव बघितले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी एकदा फायनल खेळली आहे, मात्र विजेतेपदापासून वंचित आहे.

Photo – IPL मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे टॉप 5 खेळाडू

आपली प्रतिक्रिया द्या