IPL 2020 – …म्हणून सूर्यकुमार यादवला नेटकरी करताहेत एकदम कडक सॅल्युट

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा याने 68 धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट याने 3 बळी घेतले. बोल्टला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 157 धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्मा याने 50 चेंडूत 68 धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना निर्णायक लढतीत रोहितने केलेल्या या खेळीचे कौतुक होत आहे. मात्र यासोबतच मुंबईचा खेळाडू सूर्यकुमार यादव याचीही चर्चा सुरू असून त्याला नेटकरी सलाम ठोकत आहे.

img_20201111_102128

दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डिकॉक 20 धावांवर बाद झाल्यावर रोहितला साथ देण्यासाठी फॉर्मात असणारा सूर्यकुमार फलंदाजीसाठी आला. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत त्याने आपला इरादा स्पष्ट केलं. मात्र 11 व्या षटकात तो धावबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 19 धावा केल्या.

Photo – ना गेल, ना विराट; ‘हा’ खेळाडू ठरला IPL 2020चा ‘सिक्सर किंग’

… म्हणून होतंय कौतुक

डावाच्य 11 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर रोहितने एक फटका मारला आणि धाव घेण्यासाठी पळाला. दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या सूर्यकुमारने त्याला नकार दिला. मात्र तोपर्यंत रोहित नॉन स्ट्राईकर एन्डला पोहोचला होता. त्यामुळे सूर्यकुमारने मागचा पुढचा विचार न करता कर्णधार रोहितसाठी आपल्या विकेट्सचे बलिदान दिले. त्याच्या या त्यागाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

img_20201111_102143

काय म्हणाला सूर्यकुमार?

दरम्यान, सामना संपल्यावर सूर्यकुमार यादव याने त्या घटनेबाबत बोलताना सांगितले की, कर्णधार रोहित फॉर्मात दिसत होता. तो चांगली फलंदाजी करत होता. त्यामुळे मी त्याच्यासाठी माझ्या विकेटचे बलिदान दिले याचे कधीही दुःख बाळगणार नाही.

IPL 2020मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज, अनकॅप खेळाडूंनी उमटवला ठसा

रोहितची प्रतिक्रिया

आपल्यासाठी स्वतःच्या विकेटचे बलिदान देणाऱ्या सूर्यकुमार यादव याचे रोहितने कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असणाऱ्या खेळाडूसाठी खरे तर मी माझ्या विकेटचे बलिदान द्यायला हवे होते, असेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या