‘द सुपर ओव्हर गर्ल’चा सोशल मीडियावर धुमाकूळ, एक ‘झलक’ अन क्षणात 80 हजार फॉलोअर्स वाढले

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेची रंगत वाढली असून गेल्या रविवारी क्रीडाप्रेमींना सलग दोन लढतीत सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. यातील मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये झालेली सुपर ओव्हर देखील टाय झाल्याने उत्कंठा आणखी वाढली. हा सामना पाहण्यासाठी मैदानावर आलेली एक ‘मिस्ट्री गर्ल’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सुपर ओव्हरमध्ये सर्वांचे लक्ष मैदानावरील प्रत्येक बारीक-सारीक घटनेकडे असताना कॅमेरामॅनने स्टॅण्डमध्ये असणाऱ्या एका मुलीवर कॅमेरा फिरवला. उत्कंठावर्धक सुपर ओव्हर दरम्यान या मुलीचे हाव भाव कॅमेऱ्यात कैद झाले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तरुणीचा शोध सुरू झाला.

screenshot_2020-10-23-13-46-49-396_com-android-chrome

किंग्ज इलेव्हनची चाहती

अखेर सोशल मीडियावर या ‘मिस्ट्री गर्ल’चा शोध लागला आणि तिचे नाव रियाना लालवानी असल्याचे समोर आले. रियाना किंग्ज इलेव्हन पंजाबची चाहती आहे.

स्टाफ सोबत संघाला पाठिंबा देण्यासाठी ती मैदानात आली होती. दुबईतील जुमेराह कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतले असून सध्या इंग्लंडमधील वारविक विद्यापीठमध्ये ग्रॅज्युएशन करत आहे.

अन फॉलोअर्सचा पडला पाऊस

सुपर ओव्हर दरम्यान स्क्रीनवर दिसलेल्या रियाना हिचे सामना सुरू होण्यापूर्वी इंस्टावर जवळपास 3 हजार फॉलोअर्स होते. मात्र एकदा स्क्रीनवर झळकल्यानंतर क्षणात यात 80 हजारांची भर पडली आणि तिच्या फॉलोअर्सची संख्या 86 हजारांवर पोहोचली.

सोशल मीडियावर त्या सुपर ओव्हरमुळे प्रसिद्धी मिळालेल्या रियान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बायोमध्ये ‘द सुपर ओव्हर गर्ल’ असे नमूद केले आहे. रियानामुळे पंजाबचे नशीब बदलले अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या