IPL 2020 – राजस्थानविरुद्ध विजयी अर्धशतक ठोकूनही शंकरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम जमा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघात सामना रंगला. महत्वाच्या लढतीत हैद्राबादने राजस्थानवर 8 विकेट्सने विजय मिळवत आव्हान कायम राखले. हैद्राबादकडून मनीष पांडे आणि विजय शंकर यांनी अर्धशतकीय खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शंकरने 2018 नंतर पहिल्यांदाच 50 हुन अधिक धावा केल्या. मात्र अर्धशतक ठोकूनही त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला.

नववा खेळाडू

राजस्थानविरुद्ध अर्धशतक पूर्ण करण्यासाठी विजय शंकर याने तब्बल 51 चेंडूचा सामना केला. यंदाच्या हंगामातील हे सर्वात संथ अर्धशतक आहे.

आयपीएल इतिहासात 50 हुन अधिक चेंडूचा सामना केल्यानंतर अर्धशतक करणारा शंकर नववा खेळाडू ठरला आहे. तसेच शंकरचे आयपीएल कारकिर्दीतील हे तिसरे तर यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक आहे.

यंदाच्या हंगामात विजय शंकर याने 5 लढती खेळल्या आहेत. यात त्याने 23 च्या सरासरीने आणि 102 च्या स्ट्राईक रेटने 71 धावा केल्या आहेत.

गोलंदाजीतही चांगली कामगिरी

विजय शंकर याने राजस्थान विरुद्ध फलंदाजीसह गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. शंकरने 3 षटकात 15 धावा देत विस्फोटक खेळाडू जोस बटलर याला बाद केले. नंतर फलंदाजीमध्ये मनीष पांडे याच्याच्यासोबत नाबाद शतकीय भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

IPL मध्ये सलग 4 अर्धशतक ठोकणारे 3 हिंदुस्थानी खेळाडू, जाणून घ्या

हैद्राबादचा विजय

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने 6 बाद 154 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या हैद्राबादला डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोच्या रुपात सुरुवातीला दोन धक्के बसले.

screenshot_2020-10-23-10-24-03-927_com-twitter-android

यानंतर मनीष पांडे आणि विजय शंकर याने नाबाद शतकीय भागीदारी करत 18.1 षटकात 2 बाद 156 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मनीष पांडे याने नाबाद 83 तर विजय शंकर याने नाबाद 52 धावा केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या