पंजाबविरुद्ध मैदानात उतरताच विराटचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेच्या 31 व्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर 8 विकेट्स राखून विजय मिळवला. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा उभारल्या. पंजाबच्या संघाने ख्रिस गेल आणि के.एल. राहुलच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर विजय मिळवला. या लढतीत आरसीबीला पराभव सहन करावा लागला असला तरी कर्णधार विराटने नवा विक्रम आपल्या नावे केला.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दहावी धाव घेताच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहली याने केला. याआधी हा विक्रम चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी याच्या नावावर होता. धोनीने आतापर्यंत 4,275 धावा ठोकल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानावर गौतम गंभीर असून त्याच्या नावावर 3,518 धावा केल्या आहेत.

IPL 2020 – एकाच षटकात विराट-डिव्हीलिअर्सला बाद करत शमीची खास विक्रमाला गवसणी

यासह विराटने आणखी एक विक्रम करत इतिहास रचला. विराट कोहली एकाच आयपीएल फ्रेंचायजी कडून 200 लढती खेळण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटमे आरसीबीसाठी आयपीएलमध्ये 185 लढती आणि चॅम्पियन्स टी-20 लीगमध्ये 15 लढती खेळल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या