IPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल

टीम इंडियाचा सर्वात फिट खेळाडू असे बिरुद मिरवणारा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर भयंकर ट्रोल होतोय. गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध विराटने के.एल. राहुलचे दोन सोपे झेल सोडले. यामुळे राहुलने दमदार खेळी करत 69 चेंडूत नाबाद 132 धावा ठोकल्या.

IPL 2020 – सलग दुसऱ्या पराभवासह सीएसकेने नोंदवला लाजिरवाणा विक्रम

दरम्यान, राहुल शतकाच्या नजीक पोहोचलेला असताना विराट कोहली याने सोपे झेल सोडले. विराटने डेल स्टेन आणि नवदीप सैनी यांच्या गोलंदाजीवर सोपे झेल सोडले तेव्हा राहुल 82 आणि 89 धावांवर होता.

IPL 2020 – मैदानात येताना ‘ग्लुकोज’ चढवून या, दिग्गज खेळाडूने उडवली धोनीसेनेची खिल्ली

विराटने झेल सोडल्याने राहुलने शतकी खेळी करत संघाला द्विशतक गाठून दिले. मात्र यामुळे विराट भयंकर ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर केले जात आहेत.

दरम्यान, पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. यानंतर बंगळुरूच्या संघाला 109 धावांमध्ये गारद करत 97 धावांनी मोठा विजय मिळवला.

IPL 2020 – दिल्लीच्या नावावर अजब विक्रम, चेन्नईला 3 देशात पराभवाचे पाणी पाजणारा पहिला संघ

आपली प्रतिक्रिया द्या