भावा, आता IPL सोडून मायदेशी येऊ का भो? चहल-युवराजमध्ये रंगला ट्विटरवर ‘सामना’

रविवारचा दिवस क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी ठरला. एकाच दिवशी दोन ऐतिहासिक सामने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. सायंकाळी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये झालेला सामना तर ‘अविश्वसनीय’ असाच होता. दुबईच्या मैदानावर मुंबई-पंजाबमध्ये विजयासाठी द्वंद्व सुरू असताना सोशल मीडियावर आजी-माजी क्रिकेटपटूंचा ‘सामना’ रंगला होता. टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल ट्विटरवर भिडले होते.

मुंबई-पंजाबमध्ये झालेल्या लढतीत दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारत सामना जिंकला. हा सामना सुरू असताना मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या युवीने एक ट्विट केले. पंजाबचा खेळाडू निकोलस पूरनच्या फलंदाजीवर युवी फिदा झाला. ‘आजचा सामना निकोलस पूरनच्या नावावर होणार. त्याचा बॅटिंग फ्लो आकर्षक आहे. त्याला फलंदाजी करताना पाहणे शानदार आहे आणि यामुळे मला कोणाची तरी आठवण येते, असे ट्विट युवीने केले. तसेच ‘गेम ऑन! माझा अंदाज असा आहे की पंजाब प्ले ऑफ मध्ये जाईल आणि फायनलमध्ये पंजाबचा सामना मुंबई किंवा दिल्लीशी होईल’, अशी भविष्यवाणी देखील युवीने केली.

युवराज सिंह याने केलेले ट्विट फिरकीपटू युझवेंद्र चहल याने पाहिले आणि यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. ‘भावा, आम्ही मायदेशी परत येऊ का?’, असे उत्तर चहलने युवराजच्या ट्विटला दिले.

img_20201019_132458

चहलने उत्तर दिल्यावर थांबतो तो युवराज कसला. त्याने मजेशीर अंदाजात चहलला उत्तर दिले आणि ‘आणखी थोडे षटकार खाऊन आणि विकेट घेऊन ये’, असे उत्तर युवराजने दिले. चाहत्यांनीही दोघांचा ‘सामना’ लाईक्स, रिट्विट करत गाजवला.

screenshot_2020-10-19-13-24-35-897_com-android-chrome

दरम्यान, आयपीएल 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. बंगळुरूने 9 लढतीत 6 विजय मिळवले असून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाबच्या संघाने थरारक लढतीत मुंबईचा पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली. पंजाबचा संघ सध्या सहाव्या स्थानावर विराजमान आहे. प्ले ऑफ गाठण्यासाठी पंजाबला उर्वरित सर्वच लढतीत विजय आवश्यक आहे.

IPL 2020 – …म्हणून बुमराहने पुन्हा गोलंदाजी केली नाही, जाणून घ्या ‘सुपर ओव्हर’चे नियम

आपली प्रतिक्रिया द्या