IPL 2021 धोनीचा संघ प्ले ऑफ देखील गाठू शकणार नाही!

इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल 2021) 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही स्पर्धा देशातील 6 शहारांमध्येच होत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे.

आयपीएलचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अनेकांनी विजयी संघांबाबत भाकीते केली आहेत. या दरम्यान टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर यानेही एक भाकीत केले असून चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा प्ले ऑफ देखील गाठू शकणार नाही, असे म्हटले आहे. चेन्नईचा संघ यदा पाचव्या स्थानावर राहील असे भाकीत, गंभीरने केले आहे.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

आकाश चोप्रा-मांजरेकरची साथ

दरम्यान, गौतम गंभीर याला आकाश चोप्रा आणि संजय मांजरेकर यांची साथ मिळाली आहे. या दोघांनी देखील धोनीचा संघ अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी राहील असे म्हटले आहे. चेन्नईच्या संघाची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा चांगली राहील. मात्र धोनीचा संघ प्ले ऑफ गाठणार नाही, असे आकाश चोप्रा याने म्हटले आहे.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

सातव्या स्थानावर समाधान

गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामामध्ये धोनीच्या संघाची कामगिरी सुमार राहिली होती. धोनीच्या संघाने 14 लढतींमध्ये 6 लढतीत विजय मिळवला होता, तर 8 लढतीत पराभव स्वीकारला होता. त्यामुळे धोनीच्या संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

रैनाचे कमबॅक

2020 मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये सुरेश रैना नसल्याचा फटका धोनीच्या संघाला बसला होता. यंदा त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच गेल्या वर्षी चांगली कामगिरी करणारा ऋतूराज गायकवाड याच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असणार आहे. तसेच अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो, लुंगी निगडी, फाफ डू प्लेसीस, शार्दूल ठाकूर, रविंद्र जडेजा, रॉबिन उथप्पा, मोईन अली, दीपक चहर असे एकाहून एक चांगले खेळाडू चेन्नईकडे आहेत. त्यांच्या कामगिरीवरही संघाचे गणित अवलंबून असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या