IPL 2021 पराभवानंतर CSK ला आणखी एक दणका, कर्णधार धोनीला 12 लाखांचा दंड

तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) यंदा सलामीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शनिवारी रात्री झालेल्या लढतीत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने चेन्नईचा 7 विकेट्सने पराभव केला.

चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दिल्लीने पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर लिलया पार केला. शिखर धवने 85 धावांची खेळी केली. या खेळीबद्दल त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

दुसरीकडे चेन्नईकडून शून्यावर बाद झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सामना संपल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 12 लाखांचा दंड ठोठावला. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार धोनीला दिल्ली विरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

IPL2021 मुंबईच्या पराभवाची ‘नवमी’, नोंदवला नकोसा विक्रम

काय आहे नियम?

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला सामना खेळण्यासाठी आणि प्रत्येक ओव्हरला देखील वेळ ठरवून दिलेला आहे. प्रत्येक संघाने आपले 20 ओव्हर 90 मिनिटांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. 90 मिनिटांत दोन्ही संघांना अडीच मिनिटांचा स्ट्रॅटेजीक टाईम आऊट (अर्थात ब्रेक) मिळेल. म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघांला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर आणि एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकणे बंधनकारक आहे. मात्र धोनी असे करण्यात अपयशी ठरल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला.

गोलंदाजांना फटकारले

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 189 धावा उभारूनही पराभव सहन करावा लागल्यानंतर धोनीने गोलंदाजांना फटकारले. आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी केली नाही. त्यांना यातून शिकावे लागेल आणि पुढे चांगले प्रदर्शन करावे लागेल, असे सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या