IPL 2021 चेन्नईत बेअरस्टोची हवाई फायरिंग, मैदानावरील काच फोडली; खेळाडू बचावले

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल 2021) शनिवारी सायंकाळी चेन्नईत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघात सामना रंगला. मुंबईने हैद्राबादच्या संघाचा 13 धावांनी पराभव करत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे हैद्राबादच्या संघाला सलग तिसरा पराभव सहन करावा लागला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 150 धावा करत हैद्राबादपुढे विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवले. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीच्या फलंदाजांना हैद्राबादला चांगली सुरुवात करून दिली. चेपॉकच्या मैदानावर बेअरस्टोने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. ट्रेन्ट बोल्ट आणि कृणाल पांड्यावर बेअरस्टो अक्षरश: तुटून पडला.

बेअरस्टोची ‘हवाई फायरिंग’

ट्रेन्ट बोल्टच्या षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकल्यानतंर बेअरस्टोने तिसऱ्या चेंडूला आसमान दाखवले आणि चेंडू सिमापार टोलवला. बेअरस्टोने 99 मिटरचा षटकार ठोकला. बेअरस्टोने एवढ्या जोरात हा चेंडू टोलवला होता की डगआऊट जवळ ठेवलेल्या रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर चेंडू जोरात आदळला आणि काच फुटली. मात्र खेळाडू थोडक्यात बचावले.

झुंज व्यर्थ

बेअरस्टो आणि वॉर्नरने हैद्राबादला 67 धावांची सलामी दिली. बेअरस्टो 43 धावांवर बादा झाला तर वॉर्नर पांड्याच्या एका अप्रतिम थ्रोवर रनआऊट झाला. यानंतर हैद्राबादचा डाव कोसळला आणि 19.4 षटकांमध्ये संपूर्ण संघ 137 धावांमध्ये बाद झाला. मुंबईकडून राहुल चहर आणि ट्रेन्ट बोल्टने प्रत्येकी 3 बळी घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या