IPL2021 मुंबईच्या पराभवाची ‘नवमी’, नोंदवला नकोसा विक्रम

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) च्या 14 व्या हंगामाची काल 9 एप्रिलपासून सुरुवात ढाली. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेला हा सामना बंगळुरूने 2 विकेट्सने जिंकत यंदाच्या हंगामाची विजयाने सुरुवात केली. दुसरीकडे या पराभवामुळे पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सच्या नावावर अनोखा विक्रम जमा झाला.

आयपीएलमध्ये गेल्या 9 हंगामापासून मुंबई इंडियन्सला पहिला सामना जिंकता आलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील इंडियन्सच्या संघाला 2013 पासून सलग 9 वेळा पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र या दरम्यान संघाने पाच वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) विजेतेपदही पटकावले आहे.

हार कर जीतने वाले को ‘मुंबई इंडियन्स’ कहते है! 2013 पासून पहिल्या लढतीत पराभव, पण…

शुक्रवारच्या लढतीमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि मुंबईच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रीत केले. मुंबईच्या संघाची सुरूवात निराशजनक झाली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा संघाची धावसंख्या 24 असताना बाद झाला. त्यानंतर क्रिस लिन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने 70 धावांची भागीदीरी केली. अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला लीन मोठा फटका खेळण्याच्या नादात 49 धावांवर बाद ढढाला. पाठोपाठ सूर्यकुमार यादवही 31 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. यानंतर इशान किशनने (28 धावा) वगळता इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मुंबईने निर्धारित 20 षटकामध्ये 159 धावा बनवल्या. आरसीबीचा जलदगती गोलंदाज हर्षन पटेलने 27 धावा देत मुंबईचे 5 गडी बाद केले.

जागतिक कसोटी स्पर्धेच्या फायनलची तयारी आयपीएलमध्ये, बीसीसीआयकडून देण्यात आली परवानगी

160 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरूवात उत्तम झाली. वाशिंग्टन सुंदर आणि विरोट कोहली यांनी 36 धावांची सलामी दिली. सुंदर 10 धावांवर बाद झाल्यानंतर रजत पाटीदार देखील 8 धावांवर माघारी परतला. यानंतर कोहली आणि मॅक्सवेलने डाव सावरला आणि दोघांमध्ये 52 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. कोहली 33 आणि मॅक्सवेल 39 धावा काढून बाद झाल्यानंतर डीव्हिलिअर्सने मोर्चा सांभाळला. डीव्हिलिअर्सने स्फोटक फलंदाजी करत 27 चेंडूत 48 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकामध्ये तो धावबाद झाला, मात्र तोपर्यंत आरसीबीचा विजय निश्चित झाला होता. अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेलने एक धाव घेत संघाला विजयी केले.

आपली प्रतिक्रिया द्या