IPL 2021 मॅक्सवेल, डीव्हिलिअर्सची अर्धशतके; आरसीबीचा सलग तिसरा विजय

रविवारी ‘सुपर संडे’च्या दिवशी झालेला पहिला सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 38 धावांनी जिंकला. आयपीएलच्या 14 हंगामातील बंगळुरुचा हा सलग तिसरा विजय आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सचा सलग दुसरा पराभव आहे.

बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 205 धावांचे आव्हान कोलकाताला पेलवले नाही. शुभमन गिल 21, राहुल त्रिपाठी 25, निताश राणा 18, दिनेश कार्तिक 2 हे चार खेळाडू 100 धावांमध्ये गमावल्यानंतर कर्णधार मॉर्गनही 29 धावा काढून बाद झाला. यानंतर शाकिब अल हसन (26 धावा) आणि आंद्रे रसेल (31) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. कोलकाताचा संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 166 धावा करू शकला.

बंगळुरुकडून वेगवान गोलंदाज काईले जेमिसन याने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल याने प्रत्येकी 2 आणि वाशिंग्टन सुंदरने 1 बळी घेतला.

IPL 2021 ‘तो’ संघ विजयाच्या लायकच नाही, मांजरेकरांनी टीम सिलेक्शनवरुन उपटले कान

मॅक्सवेल-डीव्हिलिअर्सची धडाकेबाज फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहली (5 धावा) आणि रजत पाटीदार (1 धाव) व झटपट बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलिअर्स यांनी सर्व सूत्रे हाती घेत तुफान फलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेलने 49 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 78 धावांची खेळी केली, तर डीव्हिलिअर्सने अखेरपर्यंत नाबाद रहात 34 चेंडूत 76 धावा चोपल्या. या दोघांच्या दमदार खेळीमुळे संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. देवदत्त पडीकलने 25 धावांचे योगदान दिले.

IPL 2021 शमीचा ‘आशिर्वाद’ अन् चहरचा बळींचा ‘चौकार’, गुरु-शिष्याचा फोटो व्हायरल

आपली प्रतिक्रिया द्या