IPL 2021 : यंदाच्या हंगामात मोठे विक्रम करण्याचा विचार करतोय दिग्गज खेळाडू

हिंदूस्थान संघाचा कर्णधार विराट कोहलीची आयपीयलमध्ये उत्तम फलंदाजी पाहायला मिळते. आयपीएल मध्ये विराट कोहलीच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. विराटच्या धडाकेबाज खेळीने आयपीएलच्या एका हंगामात 900 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रमाचा मानकरी ठरला आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामात कोहली नवीन विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे. कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्या विक्रमाला गवसणी घालणार याची उत्सुकता आहे.

कोहली आयपीएल मध्ये 6 हजार धावांच्या जवळ

विराट कोहलीने त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे 6000 हजार धावांचा विक्रम बनण्याच्या जवळपास पोहचला आहे, विराटला 6000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 122 धावांची आवश्यकता आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. आतापर्यंत कोहलीने 192 सामन्यात 38.17 च्या सरासरीने 5878 सर्वाधिक धावा केल्या आहेत, तसेच 5 शतक आणि 39 अर्धशतक लगावले आहेत.

टी-20 मध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 269 धावांची गरज

हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीला टी- 20 प्रकारात 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 269 धावांची आवश्यकता आहे. कोहलीने 304 टी-20 सामन्यात 9731 धावा बनवल्या आहेत. कोहलीने 41.94 च्या सरासरीने धावा बनवल्या आहेत. विराट कोहली टी-20 मध्ये 10हजार धावा करणारा पहिला हिंदूस्थानी फलंदाज ठरेल.

संपूर्ण टी-20 प्रकारात सर्वाधिक धावांचा विक्रम वेस्टइंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल च्या नावावर आहे. क्रिस गेलने 416 सामन्यात 13 हजार 720 धावांचा विक्रम नावावर आहे. किरोन पोलार्ड याने 10 हजार 629 धावा बनवल्या आहेत, तसेच पाकिस्तानी शोएब मलिकने 10 हजार 488 धावा बनवल्या आहेत. कोहली धावांच्या विक्रमाच्या बाबतीत 6 व्या क्रमांकावर आहे. कोहली आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 8 सामने खेळल्यावर आयपीएल मध्ये 200 सामने खेळल्याच्या विक्रमाची नोंद होईल. एका संघाकडून 200 सामने खेळणारा विराट पहिलाच खेळाडू आहे. विराट कोहली 2008 पासून आरसीबी संघाचे नेतृत्व करत आहे, तसेच महेंद्र सिंग धोनी व रोहित शर्मा ह्या दोघांनी आयपीएल मध्ये 200 सामने खेळले आहेत.

आयपीयलमध्ये सर्वाधिक शतके

स्फोटक फलंदाज क्रिस गेलच्या नावावर विक्रम आहे. क्रिस गेलने 6 शतके झळकावली आहेत, तसेच विराट च्या नावावर 5 शतके आहेत. आयपीयलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहलीने 2 शतक लगावल्यास तो गेलच्या पुढे जाईल. त्यासाठी गेलची वादळी फलंदाजी शांत पाहिजे.

आयपीएलचे 13 हंगामापासून विराट आरसीबीच्या संघासोबत जोडला गेला आहे. यंदाच्या आयपीयलच्या 14 व्या हंगामात विराट आरसीबीच्या जर्सी मध्येच खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये कोहलीच्या नावावर अनेक विक्रमाची नोंद आहे. कोहलीने 2016 च्या आयपीएलच्या हंगामात 973 धावा बनवल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या