IPL 2021 ‘तो’ संघ विजयाच्या लायकच नाही, मांजरेकरांनी टीम सिलेक्शनवरुन उपटले कान

शनिवारी सनरायझर्स हैद्राबाद संघाला गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडून 13 धावांनी पराभव सहन करावा लागला. यंदाच्या हंगामातील हैद्राबादचा हा सलग तिसरा पराभव आहे. यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या संघावर टिका होत असून टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मांजरेकर यांनी हैद्राबाद संघाच्या संघ निवडीवर सवाल उपस्थित केला आहे.

सनरायझर्स हैद्राबाद संघाने मधल्या फळीमध्ये तीन अनुभवहिन खेळाडूंना स्थान दिल्यावरून संजय मांजरेकर यांनी हैद्राबादच्या निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत. ज्या संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह आणि अब्दुल समद या अनकॅप खेळाडूंना एकाचवेळी अंतिम 11 मध्ये स्थान मिळते, तो संघ विजयाच्या लायकच नाही, असे ट्विट मांजरेकर यांनी केले आहे.

मुंबईविरुद्ध पराभव

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 150 धावा उभारल्या. यानंतर हैद्राबादच्या संपूर्ण संघाला 137 धावांमध्ये रोखले आणि 13 धावांनी विजय मिळवला. बोल्ट आणि चहर यांनी प्रत्येकी 3 बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला.

मधली फळी कोसळली

वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी हैद्राबादला 67 धावांची सलामी दिली होती. यानंतर हैद्राबाद हा सामना सहज जिंकणार असे वाटत असताना हैद्राबादची अनुभवहिन मधली फळी कोसळली. मनिष पांडे 2, विराट सिंह 11, अभिषेक शर्मा 2 आणि अब्दुल समद 7 झटपट बाद झाल्याने हैद्राबादला पराभव सहन करावा लागला.

IPL 2021 चेन्नईत बेअरस्टोची हवाई फायरिंग, मैदानावरील काच फोडली; खेळाडू बचावले

केदार जाधवला संध मिळण्याची शक्यता

दरम्यान, 2016 मध्ये आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या सनरायझर्स हैद्राबाद संघाची मधली फळी कमकुवत आहे. त्यामुळे अनुभवी केदार जाधवला आगामी लढतींमध्ये अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच पूर्णपणे फिट नसलेल्या केन विलियम्सन याच्या फिटनेसकडेही हैद्राबादचे लक्ष असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या