‬IPL 2023 सुरांचा ‘किंग’ महेंद्रसिंगसमोर नतमस्तक, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये नक्की काय घडलं?

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात झाली. सिनेकलाकारांसह दिग्गज गायकांनी यावेळी खास परफॉर्मन्स केला. यादरम्यान गायक अरिजीत सिंग याने आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली.

त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स संघात सामना रंगला.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांनी धमाकेदार परफॉर्मन्सने सोहळा अधिक खुलवला. अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंदाना सोबतच सुपरस्टार गायक अरिजीत सिंग याने आपल्या मधूर आवाजात सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमावेळी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी कलाकारांची भेट घेतली. धोनी मंचावर जाताच अरिजितने असे काही केलं सर्व पहातच राहिले.

धोनी व अरिजित यांच्या भेटीचा हा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मंचावर भेटायला आलेल्या धोनीच्या अरिजीत पाया पडला. अरिजित सारखा सुपरस्टार गायक धोनीपुढे नतमस्तक होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. यानंतर धोनीनेही अरिजीतला रोखत मिठी मारली आणि त्या क्षणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, त्यांच्या या भेटीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरुन एमएस धोनीची क्रेझ क्रिकेटसोबतच बॉलीवूडमध्येही प्रचंड आहे, याचा आपल्याला प्रत्यय येतो.