IPL 2023 Final GT vs CSK ‘हे’ पाच खेळाडू चालले तर चेन्नई सुपर किंग्सचे विजेतेपद पक्के!

IPL 2023च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सला पराभूत केलं.

इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर रविवारी हा सामना होईल. चेन्नईने पहिल्या क्वालिफायर लढतीत गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसरीकडे दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातने मुंबईला धूळ चारत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. रविवारी गुजरात सलग दुसऱ्या, तर चेन्नई पाचव्या विजेतेपदासाठी जिवाचे रान करताना दिसेल. चेन्नईचे पाच खेळाडू जर चालले तर त्यांना पाचव्यांदा चषक उंचावण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

ऋतुराज गायकवाड –

आयपीएलच्या 16व्या हंगामामध्ये ऋतुराज गायकवाड याने दमदार कामगिरी केली असून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. 15 लढतीत त्याने 4 अर्धशतकांसह 564 धावा चोपल्या आहेत. चेन्नईला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. अंतिम लढतीतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

डेवॉन कॉन्व्हे –

चेन्नईचा सलामीर डेवॉन कॉन्व्हे यानेही ऋतुराज गायकवाडच्या तोडीस तोड कामगिरी केली आहे. त्याने 15 लढतीत 52.08च्या सरासरीने 625 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

रवींद्र जडेजा –

अंतिम लढतीत चेन्नईला विजय मिळवायचा असेल तर रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी मोलाची ठरणार आहे. फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही जडेजाला दमदार कामगिरी करावी लागेल. यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत 19 बळी घेतले असून फलंदाजीत 175 धावांचे योगदानही दिले आहे.

एमएस धोनी जादूगार – मॅथ्यू हेडन

दीपक चहर –

चेन्नईच्या वेगवान गोलंदाजीची धुरा दीपक चहरच्या खांद्यावर आहे. पॉवर प्लेमध्ये त्याच्या स्विंग होणाऱ्या गोलंदाजीपुढे भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडते. त्याने आतापर्यंत 9 लढतीत 12 बळीघेतले आहेत.

मथीशा पथिराणा –

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि मलिंकाची कॉपी असणाऱ्या मथीशा पथिराणाने आयपीएल 2023मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 11 लढतीत 17 बळी त्याने घेतले आहेत. मात्र त्याला स्वैर गोलंदाजीला आवर घालावा लागणार आहे.

दरम्यान, या पाच जणांसह अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. रहाणेचे एक वेगळेच रुप यंदा दिसले असून त्याच्या बॅटमधून वेगाने धावा निघाल्या आहेत.

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’, अंतिम सामन्यात कोट्यवधींची बक्षिसे