IPL 2023 – कोलकातावर मात करत पंजाबचा सात धावांनी विजय

पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी मात करत आयपीएलचा पहिला सामना जिंकला आहे. अचानक पाऊस पडल्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार हा सामना खेळवण्यात आला. त्यात पंजाबने कोलकाताचा सात धावा राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 20 षटकात पाच बाद 191 धावा केल्या. यात बी राजापक्षाने 50 तर शिखर धवनने 40 धावा केल्या. तर कोलकाताकडून साऊदीने दोन तर चक्रवर्ती, उमेश, नरिन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान कोलकाताची फलंदाजी सुरू झाल्यानंतर अवघी चार षटकं बाकी असताना पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळेच डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबला सात धावांनी विजयी ठरवण्यात आले.