IPL 2023 ‘आरसीबी’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, गेल्या हंगामातील शतकवीर खेळाडू संघातून बाहेर

आयपीएल 2023 सुरू होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज रजत पाटीदार टाचेच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामात टिम बाहेर असू शकतो. रजत पाटीदारवर राष्ट्रीय क्रिकेट अॅकडमी, बेंगळुरू येथे उपचार सुरू आहेत.

रजत पाटीदारने आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी धडाकेबाज खेळी केली होती. ESPNcricinfo च्या माहितीनुसार, पाटीदारला दुखापतीमुळे तीन आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील वैद्यकिय तपासणीनंतर संघासाठी पुढे खेळू शकेल किंवा नाही याचा निर्णय घेतला जाईल.