IPL लिलाव २०१८ – वेगाच्या ‘या’ बादशाहांना खरेदीदार नाही

9

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

एकीकडे आयपीएलच्या ११व्या पर्वासाठी अष्टपैलू आणि फिरकीपटूंवर कोट्यवधींची बोली लागत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगाने फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या काही खेळाडूंवर अद्यापही बोली लागलेली नाही. यामध्ये अनेक भेदक गोलंदाजांचा समावेश आहे.

आयपीएल लिलावात फिरकीपटूंची चांदी, राशिद खानवर ९ कोटींची बोली

१) लसिथ मलिंगा –
श्रीलंकेचे धारधार गोलंदाज आणि यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगावर यंदाच्या आयपीएलमध्ये एकाही संघाने बोली लावली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भल्याभल्या फलंदाजांना हैरान करून सोडणाऱ्या मलिंगाला एकही खरेदीदार मिळाला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. मलिंगा याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता.

२) मिशेल जॉन्सन –
एकेकाळी आपल्या शानदार गोलंदाजीने वर्ल्ड क्रिकेटमध्ये डंका गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनलाही यंदा एकाही संघाने खरेदी केले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यामुळे आणि वाढत्या वयामुळे त्याच्यावर बोली लावण्याची रिस्क कोणत्याही संघाने घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

३) इशांत शर्मा –
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये हिंदुस्थानी गोलंदाजीची कमान असलेल्या इशांत शर्मावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. इशांत शर्माची बेस प्राईज ७५ लाख रुपये होती.

४) टीम साऊदी –
न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा कणा समजल्या जाणाऱ्या टीम साऊदीवरही कोहत्याच संघाने बोली न लावल्याने तो अनसोल्ड राहिला. साऊदीला स्विंग गोलंदाजीचा वस्ताद समजले जाते.

५) जोश हेझलवूड –
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि अचुक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला जोश हेझलवूडलाही खरेदी करण्यासाठी कोणत्याच संघाने उत्सुकता दाखवली नाही.

६) मिशेल मॅक्क्लेनाघन –
न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्क्लेनाघनवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.

७) जेम्स फॉल्कनर –
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजीतही चमक दाखवणाऱ्या जेम्स फॉल्कनरला विकत घेण्यासाठी कोणत्याही संघाने रुची दाखवली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या