सट्टा घेणाऱ्या आठ बुकींना अटक

43

सामना प्रतिनिधी । जालना

जालना आणि मंठा शहरात पोलिसांनी आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या आठ बुकींच्या मुसक्या आवळल्या. जालना येथे चार तर मंठा येथेही चार बुकींना पकडण्यात आले. जालना शहरातील हॉटेलमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांच्या ताब्यातून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर मंठ्यातही चार बुकींना अटक करून ७ मोबाईल व रोख ५० हजार जप्त केले आहे.

सदर बाजार ठाण्याचे डीएसबीचे कृष्णा तंगे व रवींद्र देशमुख यांना शहरातील एका हॉटेलमध्ये मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स आयपीएलवर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सचिन बारी व निरीक्षक महादेव राऊत यांनी विशेष पथकातील पोहेकॉ. स्कॉट व श्रीकुमार आडेप यांच्यासह बाबुराव काळे चौक येथील हॉटेलवर छापा मारला. या ठिकाणी अमित हिरालाल रठ्ठय्या (कपडा बाजार, जालना), विनोद दादुराम रठ्ठय्या (आदित्य कॉम्प्लेक्स, बडीसडक), शेख नजीर शेख इब्राहिम (खडकपुरा), रूपेश गणेश घोडके (सिटीजन्स ढाब्याच्या पाठीमागे, लालबाग जालना) हे चार बुकी आढळून आले. त्यांच्या ताब्यातून महागडे मोबाईल व रोख १ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुख्य बुकी सोनू चौधरी, विनोद भगत, सूरज काबलिये हे फरार असून, त्यांच्याविरुद्ध पोकॉ. कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या कारवाईत विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, कर्मचारी कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, शिवाजी जमधडे, मनोज काळे, कैलास खाडे, संदीप बोंद्रे, संतोष पवार, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, किरण चेके, देवीदास भोजने तसेच विशेष कृती दलाचे पोहेकॉ स्कॉट, श्रीकुमार आडेप सहभागी झाले.

मंठ्यात चार बुकी पकडले
मंठा शहरातही पोलिसांनी चार सट्टेबाजांना अटक केली . पोलिसांनी धाड टाकून बुकी अमोल गणेशराव मोरे (देवठाणा), भागवत रामदास कव्हळे (वांजुळा), दीपक रामेश्वर तोडकर (तुकारामनगर), दीपक महादेवराव बोराडे यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाईल, एक एलसीडी टीव्ही व रोख ५० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष एस. वाळके यांच्या पथकातील ए.बी. तडवी, कॉन्स्टेबल डी.पी. मेहेत्रे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या