पुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस

महेंद्रिंसग धोनीचा चेन्नई सुपरिंकग्स संघ व श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स संघ यांच्यामध्ये शुक्रवारी आयपीएलची लढत रंगणार आहे. यावेळी एकीकडे मागील लढतीत राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर झोकात पुनरागमन करण्यासाठी चेन्नई सुपरिंकग्सचा संघ सज्ज असेल. दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाबला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केल्यानंतर सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ जिवाचे रान करताना दिसेल.

पृथ्वी, शिखर, हेथमायर यांच्याकडून आशा

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या लढतीत विजय मिळवला आणि चांगली सुरुवात केली. पण या लढतीत श्रेयस अय्यर, रिषभ पंत व मार्कस स्टोयनीस यांनी फलंदाजीत चमक दाखवली. पृथ्वी शॉ, शिखर धवन व शिमरोन हेथमायर यांना ठसा उमटवता आलेला नाही. त्यांना उर्वरित लढतींमध्ये चमक दाखवावी लागणार आहे.
अश्विनच्या अनुपस्थितीमुळे रबाडावर दबाव वाढलाय

रवीचंद्रन अश्विनला सलामीच्या लढतीत दुखापतीला सामोरे जावे लागले. पण यामुळे वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडावरील दडपण वाढले आहे. संपूर्ण गोलंदाजीची धुरा त्याला सांभाळावी लागणार आहे. मोहित शर्मा, अक्षर पटेल व मार्वâस स्टोयनीस या गोलंदाजांनी त्याला उत्तम साथ देणे गरजेचे आहे. रवीचंद्रन अश्विन केव्हापर्यंत फिट होईल हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे.

धोनीला पुढाकार घ्यावा लागेल

शेन वॉटसन, मुरली विजय, फाफ ड्युप्लेसी, केदार जाधव हे अनुभवी फलंदाज संघांमध्ये असतानाही दुसNया लढतीत चेन्नई सुपरिंकग्सला 217 धावांचा पाठलाग करता आला नाही. कर्णधार महेंद्रिंसग धोनीने स्वत:ला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आणले. ही बाब जगभरातील क्रिकेटप्रेमींना खटकली. आता सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत त्याने कर्णधारासोबतच फलंदाजीसाठी पुढाकार घ्यायला हवा. वरच्या क्रमांकावर त्याने फलंदाजीला यायला हवे असा सूर यावेळी उमटू लागला आहे. अंबाती रायुडूला संपूर्ण फिट होण्यासाठी आणखी थोडा वेळ जाणार आहे. कदाचित आणखीन एका लढतीला तो मुकू शकतो, असे सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले.

  • आजची लढत – चेन्नई सुपरिंकग्स vs दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली कॅपिटल्स दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, रात्री 7.30 वाजता )
आपली प्रतिक्रिया द्या