जिगरबाज दिल्लीने रोखली हैदराबादची विजयी दौड

15

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कर्णधार झहीर खानच्या अनुपस्थितीत दिल्ली डेअरडेव्हील्स संघाने आज फिरोजशहा कोटला मैदानावर बलाढ्य सनरायझर्स हैदराबाद संघावर ६ विकेट आणि ५ चेंडू राखून विजय मिळवत स्पर्धेतील सनसनाटी निकालाची नोंद केली.

कर्णधार वरुण नायर (१० चेंडूंत ३९), रिषभ पंत (२० चेंडूंत ३४), श्रेयस अय्यर (२५ चेंडूंत ३३) आणि कोरे ऍण्डरसन (२४ चेंडूंत ४१) हे दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दिल्लीने विजयासाठीचे १८६ धावांचे आव्हान पार करताना १९.१ षटकांत ४ बाद १८९ अशी धावसंख्या उभारली. दिल्लीचा हा तिसरा विजय आहे. आजच्या पराभवानंतरही हैदराबाद १३ गुणांसह गुणतालिकेत तिसऱया स्थानी आहे. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने कर्णधार डेव्हीड वॉर्नर (११ चेंडूंत ३०), शिखर धवन (१७ चेंडूंत २८) व युवराज सिंग (४१ चेंडूंत ७०) यांच्या तुफानी खेळाच्या बळावर २० षटकांत ३ बाद १८५ अशी मोठी मजल मारली होती. पण हैदराबादचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांना रोखू न शकल्याने त्यांना आज पराभव पत्करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या