मुंबईचा दमदार विजय

16

सामना ऑनलाईन, मुंबई

हरभजन सिंग (२१ धावांत २ विकेट) व जसप्रीत बुमराह (२४ धावांत ३ विकेट) यांनी गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादला १५८ धावांत रोखल्यानंतर माजी विजेत्या मुंबई इंडियन्सने १८.४ षटकांत ६ बाद १५९ अशी विजयी मजल मारत यंदाच्या आयपीएलमधील आपला दुसरा विजय साकारला. पार्थिव पटेल (२४ चेंडूंत ३९) व नितीश राणा (३६ चेंडूंत ४५) हे यजमान मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा (४) व कायरॉन पोलार्ड (११) हे बिनीचे फलंदाज आजही अपयशी ठरले. पराभूत हैदराबादच्या वतीने शिखर धवन (४२ चेंडूंत ४८) व कर्णधार डेव्हिड वॉर्नर (३४ चेंडूंत ४९) या जोडीनेच संघाच्या डावाला काहीसा आकार दिला.

आपली प्रतिक्रिया द्या