40 मिनिटांचा विलंब; मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स लढतीत नियम मोडला

मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामधील बुधवारी झालेल्या लढतीत नियम मोडला गेला. या लढतीतील पहिला डाव तब्बल 40 मिनिटे उशिरा संपला. यामुळे बीसीसीआय, आयपीएलसह याच्याशी संबंधित असणाNया सर्वांनाच याचा फटका बसला आहे. आयपीएल स्पर्धेतील एक डाव एक तास व 25 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला हवा. याचाच अर्थ 85मिनिटांमध्ये एक डाव संपायला हवा. पण बुधवारच्या लढतीत प्रथम फलंदाजी करीत असलेल्या मुंबई इंडियन्सचा डाव 125 मिनिटांनंतर संंपला. याचा अर्थ तब्बल 40 मिनिटांचा विलंब झाला. यामुळे ही लढत हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 11.46 वाजता संपली. हा रेकॉर्ड वेळ ठरला.

चौकार-षटकारांची आतषबाजी अन् आर्द्रतेमुळे फरक?

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी या लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. यावेळी अबुधाबीत कमालीची आद्र्रता जाणवते यामुळे विलंब होत असेल असे यावेळी म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण हिंदुस्थानात एप्रिल व मे या दोन महिन्यांत प्रचंड प्रमाणात क्रिकेट खेळले जाते. उन्हातही धावांचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे कारण देणे योग्य ठरणार नाही.

परिणाम या विभागांवर होणार

हिंदुस्थानातील प्रेक्षकांना आयपीएलच्या लढती बघायला मिळाव्यात. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नसल्यामुळे टेलिव्हिजनच्या माध्यमांतून महसूल कमवता यावा यासाठी रात्री आठऐवजी साडे सात वाजता लढती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण लढत उशिरा संपल्यास सर्वांवरच याचे परिणाम दिसून येतील. लढतींचे प्रक्षेपण करणारी वाहिनी स्टार इंडिया, संघ मालक, स्पॉन्सर्स, अॅडव्हटायझर्स आणि टीव्हीवरून लढत पाहणारे प्रेक्षक या विविध विभागांवर पडसाद उमटू शकतात. त्यामुळे यापुढे बीसीसीआय याविरोधात कठोर पाऊल उचलेल यात शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या