किंग्ज इलेव्हनला बंगळुरूचे चॅलेंज

37

इंदूर

रायझिंग पुणे सुपरजायंट संघाला हरवून विजयाचे खाते उघडणाऱया किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असेल. सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर बंगळुरूने दुसऱया लढतीत दिल्ली डेअरडेविल्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. त्यामुळे उभय विजयी संघामध्ये चुरशीची लढत होणार एवढे नक्की.

फलंदाजी ही पंजाब संघाची प्रमुख ताकद होय. त्यांच्याकडे कर्णधार ग्लेन मॅक्सवेलसह हशिम अमला, मनन व्होरा, डेव्हिड मिलर असे मॅचविनर फलंदाज आहेत. सलामीच्या लढतीत पुणे संघाला १६३ धावांवर रोखून आम्ही गोलंदाजीतही कमी नसल्याने पंजाबने दाखवून दिले आहे. दुसरीकडे विराट कोहली व एबी डिव्हिलीयर्स यांच्या गैरहजेरीत बंगळुरू संघाची ताकद कमी झाली आहे. मात्र प्रभारी कर्णधार शेन वॉटसन व ख्रिस गेल असे खतरनाक खेळाडू या संघात आहेत हे विसरता येणार नाही. शिवाय या संघातील केदार जाधवचाही धसका सर्व संघांनी घेतला आहे. शिवाय या संघाकडे युजवेंद्र चहल नावाचा प्रतिभावान फिरकीपटू आहे. शेन वॉटसन, पवन नेगीसह विविधतेने नटलेली गोलंदाजीही बंगळुरूच्या दिमतीला आहे. त्यामुळे पंजाब संघापुढे बंगळुरूचे चॅलेंज असेल.

आपली प्रतिक्रिया द्या