आयपीएल टी-२० क्रिकेट, फलंदाजांच्या हेल्मेटवर कॅमेरा लावणार

26

सामना ऑनलाईन, मुंबई

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या सत्रात फलंदाजांच्या हेल्मेटवर कॅमेरा लावण्यासाठी ‘बीसीसीआय’ विचाराधीन आहे. क्रिकेटशौकिनांना मैदानावरील प्रत्येक गोष्टीचा थरार जवळून अनुभवता यावा हा यामागील उद्देश होय.

हेल्मेटवर कॅमेरा लावला तर प्रेक्षकांना गोलंदाजाच्या हातातून सुटणारा चेंडूही स्पष्टपणे बघता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटमधील अधिक बारकावे समजण्यास नक्कीच मदत होईल. बिग बॅश लीगमध्ये २०१२ मध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. प्रेक्षकांनाही हा नवा प्रयोग चांगलाच आवडला होता. हेल्मेटवर कॅमेरा लावून प्रथम फलंदाजीला आलेला खेळाडू शेन वॉटसन होय. या आधी पंचांच्या कॅपला कॅमेरा आणि मैदानावरील क्रिकेटपटूबरोबर माईकही देण्यात आला होता. मैदानावर माईक असल्याने खेळाडू थेट समालोचकांशी बोलू लागला. पंचांच्या कॅपला कॅमेरा २०१४ च्या ‘आयपीएल’मध्ये लावण्यात आला होता. ‘आयपीएल’प्रेमींना हा प्रयोगही चांगलाच पसंत पडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या