Photo – 2008 ते 2022, एका क्लिकवर वाचा IPL विजेत्या संघांची नावे

2022 – गुजरात टायटन्सने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत पहिल्याच प्रयत्नामध्ये विजेतेपद पटकावले.

2021 – चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 27 धावांनी पराभव केला आणि चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.

csk

2020 – दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेला अंतिम सामना मुंबई इंडियन्सने जिंकला आणि सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल चषक उंचावला.

mi-2020

2019 – चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेला लो स्कोरिंग लढतीत मुंबई इंडियन्सने 1 धावाने विजय मिळवत चौथ्यांदा चषक उंचावला.

mi-2019

2018 – सनरायझर्स हैद्राबादने दिलेले आव्हान लीलया पार करत चेन्नई सुपर किंग्जने 8 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धा जिंकली.

csk-2018

2017 – मुंबई इंडियन्सने अंत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पुण्याचा फक्त एका धावेने पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलचा करंडक उंचावला.

mi-2017

2016 – सनरायझर्स हैदराबादने बेंगळुरूचा थरारक सामन्यात 8 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावला. 

srh-2016

2015 – मुंबई इंडियन्सने चेन्नईचा 41 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा चषकावर कब्जा केला. 

mi-2015

2014 – कोलकाताने किंग्ज 11 पंजाबचा 3 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.

kkr-2014

2013 – चेन्नईच्या हातून 2010 मध्ये पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सने पराभवाचा बदला घेत 23 धावांनी विजय मिळवला आणि करंडक जिंकला. 

mi-2013

2012 – दोन वेळच्या विजेत्या चेन्नईचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सने 5 विकेट्सने विजय मिळवत पहिल्यांदा चषकावर नाव कोरले. 

kkr-2012

2011 – बेंगळुरूचा 58 धावांनी विजय मिळवत चेन्नईने दुसऱ्यांदा आयपीएलचा विजेतेपद पटकावला. 

csk-2011

2010 – पहिल्या सत्रातील उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले.

csk-2010

2009 – दुसऱ्या सत्रामध्ये डेक्कन चार्जर्सने बेंगळुरूवर 6 धावांनी थरारक विजय मिळवत चषकावर नाव कोरले. 

dc-2009

2008 – आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थानने चेन्नईवर 3 विकेटने विजय मिळवत विजेतेपद पटकावला. 

rr-2008