IPL2020 धोनीच आमचा कर्णधार असेल – काशी विश्वनाथन

‘आयपीएल’च्या इतिहासात चेन्नई सुपरकिंग्जचा संघ प्रथमच अंतिम चारमध्ये नसेल. कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह इतर अनुभवी खेळाडूंनी निराशा केल्याने हा संघ गुणतालिकेत रसातळाला आहे. त्यामुळे 39 वर्षीय धोनी ‘आयपीएल’मधील भवितव्यावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मात्र 2021च्या आयपीएलमध्येही धोनीच चेन्नई संघाचा कर्णधार असेल, असे या संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले. धोनीने चेन्नईला तीन वेळा ‘आयपीएल’चा करंडक जिंकून दिलेला आहे. एखाद्या स्पर्धेत संघाची खराब कामगिरी झाली म्हणून सर्व काही बदलण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या