एकवीरा देवी कळस चोरी प्रकरण, चोरटे अद्याप बिनबोभाट

सामना ऑनलाईन । पुणे

लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा असलेला पंचधातूचा कळस ३ ऑक्टोबरला चोरीला गेला होता. या घटनेला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ उलटूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी मंगळवारी मंदिर परिसराला भेट दिली. स्थानिक पोलिसांना या प्रकरणात अद्याप कोणताही सुगावा सापडलेला नाही. त्यामुळे नांगरे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

नांगरे- पाटील यांनी एकविरा मंदिर परिसराला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी स्थानिक पोलिसांना तपासाचा वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्या. गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबरला कळसाची चोरी झाली होती. चोरीचा प्रकार सकाळी आठच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भक्ताला लक्षात आला, त्याने मंदिर प्रशासनाला चोरीची माहिती दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या