इराण-अमेरिका वाद शिगेला; थेट ट्रम्प विरोधात अटक वॉरंट जारी, इंटरपोलकडे मदतीचे आवाहन

2398

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटकेसाठी इराणने वॉरंट जारी केले आहे. त्यांनी ट्रम्प आणि इतर लोकांना ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलची मदत मागितली आहे. तेहरानचे अभियोक्ता अली अलकासीमहर यांनी सोमवारी सांगितले की, ‘ट्रम्प यांच्यावर 3 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात 30 हून अधिक लोकांसोबत सहभागी असल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी ठार झाले होते.’

काय आहे प्रकरण?

अमेरिकेने 3 जानेवारी रोजी बगदादच्या विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार केले होते. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध अधिकच बिघडले असून दोन्ही देश एकमेकांना धमक्या देत आहेत. सुलेमान यांच्या मृत्यूचा ‘खतरनाक’ बदला घेणार असा धमकीवजा इशारा इराणचे सर्वेसर्वा अयातुल्लाह खोमेनी यांनी दिला होता. ‘आयएसएनए’च्या वृत्तानुसार, या हल्ल्याचे जबाबदार म्हणून अलकासीमहर यांनी ट्रम्प व्यतिरिक्त इतर कोणाचीही ओळख पटविली नाही. तसेच ट्रम्प यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही इराणने त्याच्यावर लावण्यात आलेले चार्जेस मागे घेणार नसल्याचे या वृत्तात सांगण्यात आले आहे. असे असेल तरी ट्रम्प यांना अटकेचा कोणाही धोका नाही आहे.

इराणने ‘रेड नोटीस’ जारी करण्याची केली मागणी

अलकासीमर यांच्या म्हणण्यानुसार, इराणने इंटरपोलकडे ट्रम्प आणि या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर लोकांच्या विरोधात ‘रेड नोटिस’ जारी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान इंटरपोल ज्याच्याविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावते त्या व्यक्तीस अटक करण्यास सदस्य देशास भाग पाडू शकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या