इराणी करंडकासाठी सीसीआय सज्ज

45

मुंबई – गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (सीसीआय) आपले ब्रेबॉर्न स्टेडियम २० जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या इराणी करंडक लढतीसाठी सज्ज ठेवले आहे. या लढतीत मुंबई व गुजरात यांच्यातील रणजी करंडक विजेता संघ शेष हिंदुस्थान संघाविरुद्ध खेळणार आहे. इंदूरच्या होळकर मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक अंतिम लढतीत उपस्थित असलेली राष्ट्रीय निवड समिती ज्यात अध्यक्ष एमएसके प्रसाद, सदस्य सरणदीप सिंग आणि जतीन परांजपे यांचा समावेश आहे. १४ जानेवारीला शेष हिंदुस्थान संघाची निवड जाहीर करणार आहेत. हा संघ रणजी विजेत्या संघाशी झुंजेल.

आपली प्रतिक्रिया द्या