इरफान खानचा ‘हा’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

37

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानातून ऑस्करसाठी अासामी चित्रपट व्हिलेज रॉकस्टार पाठविण्यात आला आहे. मात्र बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान याचा देखील एक चित्रपट ऑस्करसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र हा चित्रपट हिंदुस्थानातील नसून बांगलादेशमधील आहे. बांगलादेशमध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकलेला इरफानचा ‘दूब : नो बेड ऑफ रोझेझ’ हा चित्रपट बांगलादेशने ऑस्करसाठी पाठवला आहे.

बांग्लादेशी दिग्दर्शक मुस्तफा सरवर फारुकी यांचा ‘दूब : नो बेड ऑफ रोझेझ’ हा चित्रपट दिवंगत बांगलादेशी लेखक हुमायूं अहमद यांच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जाते. हूमायू यांनी त्यांचे २७ वर्षांचे लग्न मोडून त्यांच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान असलेल्याा अभिनेत्रीशी लग्न केले होते. हा चित्रपटावर बांगलादेशमध्ये काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी हा चित्रपट बांगलादेशसहीत हिंदुस्थान, फ्रांस, ऑस्ट्रेलियामध्ये प्रदर्शित झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या