वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न खेळता सर्वाधिक बळी, टीम इंडियाच्या खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम

1886

कोणत्याही खेळाडूसाठी, वर्ल्ड कपमध्ये सामना खेळणे हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न पूर्ण होण्यासारखे असते. परंतु जागतिक क्रिकेटच्या इतिहासात असे काही क्रिकेटपटू आले आहेत ज्यांना वर्ल्ड कपमध्ये सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती, पण आपल्या कारकीर्दीत चांगली कामगिरी करण्यात ते नक्कीच यशस्वी ठरले.

इरफान पठाण हा जगातील एकमेव गोलंदाज आहे, ज्याने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळला नव्हता परंतु एकदिवसीय सामन्यात दीडशेहून अधिक बळी मिळवण्यास यश मिळवले आहे. इरफान जगातील एकमेव गोलंदाज आहे ज्याने असा पराक्रम केला आहे, ज्याने वर्ल्ड कपमधील सामने न खेळता एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी मिळवले आहेत.

इरफानने एकदिवसीय कारकीर्दीत 120 सामने खेळून 173 बळी मिळविले आहेत. एकदिवसीय कारकीर्दीत इरफानला 2007 च्या विश्वचषकात भारतीय संघात संधी मिळाली. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब होती आणि पहिल्याच टप्प्यातून भारतीय संघ बाद झाला. जरी इरफानला वर्ल्ड कपमध्ये संघात समाविष्ट करण्यात आले होते तरीही राखीव खेळाडू असल्याने तो एकही सामना खेळू शकला नाही.

irfan-pathan

जरी इरफान पठाणला एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु 2007 टी -20 विश्वचषक, 2009 आणि 2012 मध्ये खेळलेल्या टी -20 विश्वचषकात तो हिंदुस्थानकडून खेळला आहे.

इरफान पठाण आपल्या कारकीर्दीत 120 एकदिवसीय सामने, 24 टी -20 आंतरराष्ट्रीय आणि 29 कसोटी सामने खेळला आहे. यावेळी त्याने एकदिवसीय सामन्यात 173 विकेट आणि 1,544 धावा केल्या आहेत, टी -20 मध्ये 28 विकेट आणि 172 धावा केल्या आहेत आणि त्याव्यतिरिक्त कसोटी सामन्यात 100 विकेट आणि 1,105 धावा करण्यात तो यशस्वी झाला आहे. इरफानने कसोटी क्रिकेटमध्ये शतकही नोंदवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या