लोकांना वाटले कोरोनापाठोपाठ एलियनचे संकट आले, पण निघाला ‘आयर्न मॅन’ बलून

आधीच कोरोना महामारीने भयभीत झालेल्या उत्तर प्रदेशवासीयांत शनिवारी आपल्या गावावर एलियनचे संकट आल्याच्या अफवेने मोठी खळबळ उडाली होती. त्याचे असे झाले की, यूपीच्या नोयडातील दनकौर गावाच्या आकाशावर ग्रामस्थांना एक विचित्र आकृती हवेत फिरत दिसली. झाले, आता कोरोनापाठोपाठ परग्रहांवरील एलियनच्या हल्ल्याचे संकट आले अशी अफवा पुणीतरी पसरवली. हाहा म्हणता नोयडासह संपूर्ण यूपीत हे वृत्त पसरले आणि नागरिकांत एकच दहशत पसरली. अखेर आकाशात फिरणारी वस्तू म्हणजे सुपर हिरो आयर्न मॅनच्या आकाराचा हवेचा बलून असल्याचे पोलिसांनी स्पष्ट करताच नोयडावासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यूपी पोलीस आता हा विचित्र बलून आकाशात सोडणाऱया व्यक्तींचा शोध घेत आहेत.

शनिवारी सकाळपासून यूपीच्या दनकौर गावाच्या आकाशात एक विचित्र वस्तू हवेत फिरत होती. ग्रामस्थांनी संशयित वस्तू पाहण्यासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. जो तो स्वत:चा अंदाज व्यक्त करीत आपले ज्ञान पाजळत होता. त्यातल्याच एका नागरिकाने आपल्या गावावर परग्रहावरून आलेला एलियन फिरतोय अशी अफवा पसरवली आणि नोयडावासीयांची झोपच उडाली. अखेर काही वेळाने बलूनमधील हवा कमी झाल्यावर हा प्लास्टिकचा आयर्नमॅन खाली आला आणि भट्टी करसौल कालव्यातील पाण्यात असणाऱया झुडुपात अडकला. पाण्याच्या प्रवाहाने या बलूनची हालचाल होत असल्याने नागरिकांत अधिकच भीती पसरली होती. अखेर दनकाwर पोलिसांनी कालव्याच्या पाण्यातून ‘आयर्न मॅन’ बलून बाहेर काढल्यावर नागरिकांचा जीव भांडय़ात पडला.

‘आयर्न मॅन’ बलून सोडणाऱयाचा शोध सुरू
दनकाwरच्या आकाशात फिरणारा बलूनला आयर्न मॅनचे रूप देण्यात आले होते. त्यामुळे या विचित्र आपृतीवरून नोयडात दहशत पसरली होती. पुणी गंमत म्हणून अथवा दहशत पसरवण्यासाठी हा बलून सोडला, त्या व्यक्तीचा शोध यूपी पोलीस घेत असल्याची माहिती दनकाwरचे स्टेशन पोलीस प्रमुख अनिल पुमार पांडे यांनी दिली. पोलिसांनी त्यानंतर या प्रकाराची माहिती जनतेत फिरून दिली आणि पुणीही अफवा अथवा दहशत पसरवणारी माहिती पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केल्याचेही पांडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या