सात वर्षीय चिमुरडीशी मेहुण्याचे अश्लिल वर्तन, आरोपी अटकेत

22

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

सात वर्षीय अल्पवयीन मुलीशी सख्या मेहुण्यानेच अश्लील वर्तन केल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आगाशेनगर भागात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदिप बाबासाहेब दुशिंग (रा. आगाशेनगर, दत्तनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जवळ असलेल्या एका सात वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे, हवालदार भोसले करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या