मधूर भांडारकर काढताहेत तैमूरवर चित्रपट?

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भांडारकर हे करिना कपूर व सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरवर चित्रपट काढणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. भांडारकर यांनी ‘तैमूर’ असे नाव चित्रपटासाठी रजिस्टर केले ाहे. याबाबत भांडारकर यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी मात्र असा कोणताही चित्रपट तयार करत नसल्याचे सांगितले आहे.

‘माझ्या प्रोडक्शन हाऊसकडून नेहमी वेगवेगळी नावे रजिस्टर केली जात असतात. अवॉर्ड, बॉलिवूड वाईब्स अशी नावे देखील आम्ही रजिस्टर करून ठेवली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यावर आता चित्रपट तयार करत आहोत. सध्या मी वाळू माफियांवर आधारित घालिब या चित्रपटावर काम करत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून माझा या चित्रपटावर अभ्यास सुरू आहे’, असे भांडारकर यांनी सांगितले