प्रीती झिंटा प्रेग्नेंट आहे?

126

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा प्रेग्नेंट असल्याची चर्चा सध्या बि-टाऊन मध्ये रंगली आहे. प्रीतीच्या बेबी बंपचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र या फोटोत प्रीती तिच्या स्कार्फने बेबी बंप लपवताना दिसत आहे.

गुरूवारी प्रीती झिंटा मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर पडत असताना फोटोग्राफर्सने तिचे काही फोटो टिपले. त्यावेळी प्रीतीने निळ्या रंगाचा ढगळा शॉर्ट ड्रेस घातला होता. तर त्यावर काळ्या रंगाचा स्कार्फ घेतला होता. त्यात प्रीतीचा बेबी बंपही दिसत होता. त्यामुळे प्रीती झिंटा ही प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे.

priti-zinta

प्रीतीने तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड जेन गुडइनफसोबत लॉस एंजलिसमध्ये २०१६ साली लग्न केले होते. जेन हा न्यूयॉर्कमधील एका फायनॅन्स कंपनीचा उपाध्यक्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या