न्यायालयपण व्हीव्हीपॅटच्या घोटाळ्यात सहभागी आहे का? काँग्रेस नेत्याचा वादग्रस्त सवाल

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्व व्हीव्हीपॅटमधील मतनोंदणीची पडताळणी करावी अशी विरोधकांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासाहर्तेवर सवाल करत न्यायालय देखील या व्हीव्हीपॅटच्या गैरव्यवहारात सहभागी आहे का असा सवाल केला आहे.

उदित राज यांनी ट्विटरवरून सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला आहे. ‘सर्वोच्च न्यायलयाने व्हीव्हीपॅटच्या सर्व मशीनच्या तपासणीची मागणी का फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयही या घोटाळ्यात सहभागी आहे का? जर निवडणुकीच्या या काळात तीन महिने विकासकामे थांबवली जाऊ शकतात तर मतमोजणीचे काम दोन तीन दिवस चालले तर काय बिघडले, असा सवाल त्यांनी ट्विटरवरून केला आहे.

उत्तर प्रदेशात विरोधकांनी ‘ईव्हीएम’च्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर आयोगाने सर्व ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित असल्याचे म्हटले होते. तसेच शंभर टक्के व्हीव्हीपॅट मतनोंदणीची ईव्हीएमबरोबर पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.

आपली प्रतिक्रिया द्या